Thursday, 25 July 2013

छत्रपती राजश्री शाहू

छत्रपती राजश्री शाहू
महाराजांच्या जीवनातील खरां प्रसंग !!
छत्रपती राजश्री शाहू महाराजांना कुस्तीचे मोठे
व्यसन. कोल्हापूरचा गादीवर राज्याभिषेक
झाला तेव्हापासून ते ३ ला पहाटे उठून २-३ तास
लढती करत असत. महिन्यातून २ वेळा ते
शिकारीला जात असत... तत्कालीन ब्रिटीश कलेक्टर
यांना त्यांचा हा छन्द खूप आवडत असे, ते
सुद्धा त्यांच्याबरोबर शिकारीला जात असत.
छत्रपती राजश्री शाहू महाराज शिकार करत ती फक्त
माजलेल्या वाघांची किंवा अपवाद
वगळता कधीकधी जीवावर बेतले कि सांबर
किंवा काळवीट याची. एके दिवस रोजचा सराव संपवून
राजे व ब्रिटीश कलेक्टर जंगलात शिकारीला गेले...
आजचा सावज होता एक वाघ.
सकाळचा प्रहर टळून दुपार होत आली..
शिकारी मंडळी दबा धरूनच होती. मात्र पुढे
त्यांना वेगळेच पाहायला मिळाले.. एक पिसाळलेला गहू
रेडा सैरावैरा धावत होता... त्याने जंगलात
नुसता हैदोस मांडला होता . राजे व
अधिकारी घोड्यावर स्वार झाले व त्याचा पाठलाग करू
लागले.. त्या गहू रेड्याने
त्या माजलेल्या वाघाला आपल्या शिंगणे मारून टाकले
होते.. हे पाहून ब्रिटीश अधिकारी घोड्यावरून
पायउतार होऊन झाडावर चढायला धावले. नेमका हाच
फायदा उठवत तो धुंद रेडा त्या ब्रिटीश
अधिकारयाकडे आपला मोर्चा वळवत तुफान वेगाने
धावत सुटला...
हे पाहून जातिवंत पैलवान असलेले शाहूराजे स्वत:
घोड्यावर पायउतार झाले व त्या घोड्याच्या आडवे
गेले.. ते ब्रिटीश अधिकारी सुसाट धावत पळत
सुटले.., राजांनी मोठ्या हिमतीने त्या रेड्याचे शिंग
आपल्या दोन्ही हातात धरून त्याला रेटायचा प्रयत्न
केला.. रेडा व राजे दोन्हीही चवताळलेले. राजेंना मात्र
आता राग अनावर झाला.. त्यांनी हाताची मुठ
आवळली व एक जबरदस्त ठोका रेड्याच्या डोक्यात
मारला.. २-३-५-६ असे सलग ठोके बसल्यावर
रेडा जागीच चित पडला. मग राजांनी जवळ
पडलेली बंदूक काढून ३ बार त्या रेड्यात उतरवले. हे
पाहून तो ब्रिटीश अधिकारी अक्षरश
राजेंच्या पाया पडू लागला.
आजही भवानी मंडप कोल्हापूर येथे
हया रेड्याची भुसा भरलेली प्रतिकृती आहे.
छत्रपती राजश्री शाहू महाराज हे अतिशय उत्कृष्ट
दर्जाचे मल्ल(पहेलवान) होते... महाराज
आपल्या प्रतिस्पर्धी मल्लाला कुस्तीच्या रीगणांबाहेर
उचलून फेकत असत... बुद्धिचातुर्य आणि शरीराने
बलवान असेलेला हा रयतेचा राजा. महाराज
मुजरा तुम्हांला !!

No comments:

Post a Comment