Sunday 29 December 2013

भारताची पहिली महिला स्वातंञ्यसेनानी, स्ञी शौर्याची महानायिका भीमाई होळकर

भारताची पहिली महिला स्वातंञ्यसेनानी, स्ञी शौर्याची महानायिका जिचा जन्म होळकर राजवंशात झाला .भारताचे प्रथम स्वातंञ्यवीर राजे यशवंत (प्रथम) यांची ही एकूलती एक कन्या भीमाई होय.
या भिमाईने ब्रिटीशांविरूद्ध दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही.
भिमाईचा पराक्रम झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ४० वर्ष आधीचा आहे. परंतु या शूरवीर रणरागिणीच्या देशभक्तीकडे, जाज्वल्य इतीहासाकडे आणि तिच्या शौर्यगाथेकडे इतिहासकारांनी कसेकाय दूर्लक्ष केले ?
होळकर राजवंशात होऊन गेलेल्या चौदा नर -नारी रत्नांनी २२० वर्ष अप्रतीम असा राज्यकारभार केला केवळ व्यापार समृद्धीच्या दृष्टीकोनातूनच नव्हे, तर इंग्रजांच्या घुसखोरी पासुन देखील होळकर राज्याच्या चतुर्सिमा सुरक्षीत राहिल्यात . मध्यप्रदेशातील इंदोर स्थित होळकरांचे राज्य सहजासहजी इंग्रजांना गिळंकृत करता आले नाही. हेच त्यांच्या देशभक्तीचे धोतक आहे.भीमाईने रणांगणावर बलाढ्य ब्रिटीश सेनेची उडविलेली दाणादाण , त्यांचा अनेकदा केलेला पराभव , वेळोवेळी भीमाने दाखविलेला मुत्सदीपणा , रणसंग्रामाचेवेळी दाखविलेली वीरता , इंग्रज सेनेचे पाडलेले मुडदे यांमुळे इंग्रज प्रचंड दुखावलेले होते. भीमाईला धडा शिकवण्यासाठी ब्रिटीश योग्य संधीची वाट बघत होते.
एकदा भीमाईला पकडण्यासाठी इंग्रजांनी प्रचंड मोठा सैन्यांचा घेरा घातला. ब्रिटीश कर्नल माल्कमच्या योजनाबद्ध घेरावास भीमाई न्याहळत होत्या. जेव्हा घेराव अतिशय जवळ आला तेव्हा भीमाईने घोड्याची लगाम जोरात ओढली. पायाची टाच मारली. घोड्याचे दोन्ही पाय भीमाच्या डोक्यावर उसळले . माल्कम स्वतःचा बचाव करण्यासाठी विचलीत होत नाही तोच भीमाईच्या घोड्याने मोठी उडी मारली आणि घेरावाच्या पलीकडे भीमाईने घोडा उडविला. क्षणभर माल्कमला काय करावे काहीच सुचले नाही. तोपर्यंत भीमाई प्रचंड वेगाने घोडा पळवत जंगलात अदृश्य झाली. भीमाईला जिवंत पकडण्याचे स्वप्न पाहणारा माल्कम हतबल होऊन केवळ बघतच राहिला.
" वीर शेरनी लडनेवाली ,
रण से हूई सगाई थी ।
खूब लडी मर्दानी रणमें ,
वह तो इंदोर की भीमाई थी ।। "

अनेकदा रणांगणावर माल्कमला मात देऊन चकमा देणारी भीमाई जंगलात द-याखो-यात आश्रय घेत असे. गुप्तपणे गनिमी काव्याचे युद्ध तंञ वापरून ब्रिटीशांच्या शस्ञगारावर, खजीन्यवर , पोलीसठाण्यावर , सैन्य छावणीवर , धान्याच्या गोदामावर अचानक हल्ला करून त्यास लुटत असे यामध्ये आडकाठी बनणा-या इंग्रज सैन्यांना कापून पसार होत असे.
ज्या पद्धतिने गनिमी काव्याचा युद्ध तंञाने लढून छ.शिवराय व राजर्षी मल्हारबा यांनी शञूंना नामोहरम केले. अगदी तसेच शिवमल्हार तंञ वापरून भीमाईने इंग्रजांना नामोहरम केले .

१८१७ चे महिदपूरचे युद्ध
-------------------------------
महाराज यशवंत (प्रथम) याच्या मृत्यूनंतर होळकर संस्थानाच्या राजपदाची सूञं केशरबाईच्या ( कृष्णाबाई) पोटी जन्मलेला मल्हारराव ( द्वितीय) यांना रितसर देण्यात आलीत. अल्पवयीन मल्हारराव राजे जरी असले तरी शासन - प्रशासनातील बहूतांशी निर्णय केशरबाई व भीमाईच घेत असे . अशातच २० डिसेंबर १८१७ चे ब्रिटीशांविरूद्ध होळकरांचे युद्ध हे भारतीय इतिहासातील एक अविस्मरणीय घटना आहे.
भीमाईकडे २५०० छापामारीत प्रवीण असणारे घोडेस्वार होते. याशिवाय ८० तोफा , ३००० घोडदळ, ३०, ००० पायदळ तलवार एवं बंदुकांनी सज्ज होते.
इंग्रज पूर्ण तयारीनीशी होळकर संस्थान गिळंकृत करण्याच्या उद्देशाने इंदोरवर आक्रमणा करणार असल्याची सुचना राजदरबारात येऊन धडकली . लगेच भीमाईने यद्धची तयारी सुरू केली.
कॅप्टन टॉड, रायन, विकर्स या ब्रिटीश योद्ध्यांकडून प्रशिक्षण प्राप्त इंग्रज सेना महिदपूर गावच्या सिमेजवळ येऊन पोहचली .ब्रिटीश सेनेचा प्रचंड जमावडा सुरू झाला.
देशभक्ती रोमारोमात संचारलेल्या होळकर सेनेने ब्रिटीश सेनेवर प्रचंड आक्रमण केले . भीषण युद्धाला प्रारंभ झाला. वीस वर्षीय भीमाई भुकेल्या शेरणी सारखी दाहडत इंग्रज सेनेवर तूटून पडली . भीमाई अभूतपूर्व सैन्य संचलन, शस्ञ संचलन व युद्ध संचलन करून सेनेत जोश भरत होती.

ब्रिटीश सेनेचे नेतृत्व प्रचंड अनुभवी व भारतात दरारा असलेल्या कर्नल माल्कम, कमांडर टॉम्स हिस्लाप आणि मेजर हंट यांच्याकडे होते. भिषण युद्धाला प्रारंभ झाला. २० वर्षीय भीमाई, १२ वर्षीय राजे मल्हारराव, २० वर्षीय हरिराव (विठोजींचा मुलगा) हे बालक होळकर सेनेचे नेतृत्व करत होते. या बालवीरांच्या नेतृत्वात होळकर सेना ब्रिटीश सेनेवर तुटून पडली.
राजे मल्हारराव हत्तीवर बसून लढाई करत सैनिकांचे मनोधैर्य व आत्मविश्वास वाढवत होते.
भीमाईने घोड्याची लगाम दातात धरली . दोन हातात दोन तलवार घेऊन अक्षरशः ब्रिटीश सैन्यांना कापून काढत होती. भीमाईच्या शौर्याचा संदेश एका ब्रिटीश सैनिकाने मेजर हंटला कळविला . तो एकून आश्चर्यचकीत झाला. आणि लगेच भीमाईच्या दिशेने यायला लागला. विजेसमान कडाडत आणि शेरणीसारखी दाहडत भीमाई ब्रिटीश सैन्याचे मुडदे पाडतांना पाहून युद्धाचा प्रचंड अनुभव असणा-या मेजर हंटची पाचावर धारणा बसली.
मेजर हंट सैन्य तुकडीसह आपल्याकडे येतांना पाहून सिंहगर्जना करत अश्वरूढ भीमाई प्रचंड वेगाने हंटच्या दिशेने निघाली. क्षणार्धात तलवारीने हंटवर वार केला. हंटने कसाबसा तो वार बचावण्याचा प्रयत्न केला. हातातली तलवार बाजूला पडली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी झालेला हंट स्तब्ध होऊन केविलवाण्या नजरेने भीमाईकडे पाहू लागला.
हे फिरंग्या मी निशस्ञावर वार करत नाही. बघतोस काय ? ऊठ आणि युद्धाला तयार हो ! नाही तर जा आपल्या जखमेवर उपचार करून घे !
शेवटी तहाने युद्धाचा शेवट जरी झाला असला तरी बलाढ्य ब्रिटीश सैन्याची एका धनगराच्या मुलीने अशी दाणादाण उडवणे ही गोष्ट खरोखरच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.


होमेश भुजाडे नागपूर 9422803273


महाराजा तुकोजीराव होळकर -III –


बहुजन्नाचा वीर राजा (जन्म : 26 नवम्बर 1890, देहान्त 21 मई 1978 ) छत्रपति शिवाजी महाराजांचे चरित्र तत्कालीन रु २४,०००/- खर्च करूंन... जगातील सर्व भाषांमधे प्रकाशित करून विश्वभर मोफत पोहोचाविले. राजश्री शाहू यांचे निधन १९२२ साली झाले अणि रायातेने अपाला पुरोगामी राजा गमवला यातून जातीय वाद पुन्हा उफलला यावर कायमस्वरूपी उपाय महाराजा तुकोजीराव होळकर यांनी काढला अणि आपला मुलगा यशवतराव होलकर-II याचा विवाह शाहूराजांच्या चुलत बहिनिशी १९२४ रोजी करवून घेतला .असाच प्रकारे अनकहीं १०० अंतरजातीय विवाह करवून दिले अणि एक पुरोगामी चलवल सुरु झाली या सर्व गोस्टिचा परिणाम गुलामगिरीत रहनारा भारतीय समाज छात्रपतिंच्या शौर्य आणी महाराजा होळकर यांचा उघडपणे जाहिर पाठिंबा यामुल़े स्पृतित होऊन इंग्रजांच्या विरोधात बंड करून पेटून उठला . जनतेचा वधता रोष हा महाराजा होळकर यांच्या जाहिर पाठिंबा यामुल़े आहे म्हणून त्यांना राजगादी सोडावी नाहीतर शिव स्मृति जगावान्याचे कार्य बंद करावे या साठी इंग्रज हुकूमत दबाव अणु लागली.. मोडेन पण वाकणार नहीं . महापराक्रमी आद्या क्रांतिनायक महाराजा यशवंतराजे होळकर यानचा सार्थ वारस असलेले महाराजा तुकोजीराव होळकर (III) यांनी स्वतःहा हून राजगादी १९२६ मधे सोडली .. तरीही कार्य महाराजा होळकर यांनी व्यापक स्वरूपात करने सुरूच ठेवले महाराजा तुकोजीराव होळकर (III) यांनी स्वतःहाच्या पैशातून तत्कालीन रु ५,००,०००/- जगातील पहिला शिवाजी महाराजांचा पुतला पुणे (शिवाजीनगर) येथे १९३२ साली बसवला .. रायगडावारिल शिवाजी महाराजांचा सिंव्हासन रुढ़ पुतला अणि शिवाजी महाराजांच्या प्रिय वाघ्याची स्मृति तत्कालीन रु ५,०००/- खर्च करून १९३६ साली उभारली महाराजा तुकोजीराव होळकर (III) यांच्या चरनी माझे नमन.

Monday 16 December 2013

"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते.त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.राजर्षी शाहू हे प्रजावत्सल, दलितबंधू, समतेचे पुरस्कर्ते आणि निधड्या छातीचे कर्ते समाजसुधारक होते."
शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचे राजे झाले.



आरक्षणाचे प्रणेते-
मागासलेल्या वर्गाना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली.राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. ६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० % जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. त्याची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. शाहुंवर अनेक प्रकारचे आरोप केले. परंतु वंचितांच्या विकासाचे व्रत घेतलेल्या शाहूंनी कशाचीही पर्वा न करता आपले धोरण चालू ठेवले.

तथाकथित गुन्हेगार जातींविषयी भूमिका-
जातव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. परिणामी त्यांची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली. त्यांचा सामाजिक दर्जा खालावला. समाजाकडून मिळणारी अन्याय्य वागणूक व उत्पन्नाचे काहीच साधन नाही अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मागास, भटक्या जमातीतील अनेक लोकांनी पोटापाण्यासाठी चोऱ्या, दरोडे अशा गोष्टींचा आधार घेतला. तत्कालीन ब्रिटीश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहुराजांना या लोकांची कणव होती. शाहू खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी ही हजेरी पद्धत बंद केली. या जाती-जमातीतील लोकांना संघटीत करून गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त केले. त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार नेमले, रथावर वाहक नेमले. त्यांना घरे बांधून दिली. राहण्याची व पोटापाण्याची सोय झाली. शाहुराजांचे प्रेम मिळाले. त्यामुळे या लोकांनी गुन्हेगारी कारवाया सोडून देवून ‘माणूस’ म्हणून जगायला सुरुवात केली. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समान सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच.

राजर्षी शाहू आणि स्त्रियांची स्थिती-
धर्मव्यवस्थेने स्त्रियांनाही अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क-अधिकार नाकारले. स्त्रियांवर अनेक बंधने लादली.त्यामुळे स्त्रियांची एकंदर सामाजिक अधोगती झाली होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. स्त्रियांना कुणीही वाली उरला नव्हता. स्त्रियांची ही अवनती जाणून शाहू राजांनी त्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले. स्त्रियांसाठी अनेक चांगले कायदे केले. धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अनैतिक पद्धत संस्थानात चालू होती. महाराजांनी जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही अमानुष पद्धत बंद केली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून संस्थानात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसा कायदा केला. आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. तसेच त्या काळात संस्थानात शंभर मराठा-धनगर विवाह घडवून आणले. विधवांची दारूण परिस्थिती लक्षात घेवून पुनर्विवाह नोंदणीसंबंधी कायदा केला. त्यामुळे विधवांच्या परिस्थितीत बराच फरक पडला. त्यांना कायद्याने पुनर्विवाह करता येवू लागला. संस्थानातील अनेक समाजात ‘काडीमोड’संबंधी त्या-त्या जात-पंचायतींचे आपापले कायदे असत. हे कायदे पुरुषप्रधान संस्कृतीला साजेसे म्हणजेच पुरुषांना अनुकूल तर स्त्रियांना प्रतिकूल असत. त्यामुळे स्त्रियांवर नेहमी अन्याय होई. स्त्रियांच्या मतांना आणि भावनांना फारशी किंमत नव्हती. त्यामुळे स्त्रियांची कुचंबना होई. हे ओळखून शाहू महाराजांनी संस्थानात ‘काडीमोड’संबंधी कायदा केला. अशा प्रकारचे खटले रीतसर कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. स्त्रियांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनाही ‘काडीमोड’ घेण्याचे अधिकार दिले. स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या पद्धतीविरुद्धही शाहू राजांनी कायदा केला.स्त्रियांचा शारीरिक व मानसिक छळ करणे, त्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षा केल्या. त्यामुळे स्त्रियांना मोठा आधार मिळाला. राजर्षी शाहूंनी केलेल्या या अनेक स्त्री-उद्धारक कायद्यांमुळे स्त्रियांना सामाजिक प्रवाहात येण्यासाठी खूप मदत झाली.

राजर्षी शाहूंचे शैक्षणिक कार्य-
तत्कालीन वर्ण-व्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय केला. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी दलित-बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा काढल्या. तोच वारसा जपत शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी बजावली. महाराजांनी १९१७ साली कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. हा कायदा करताना महाराजांनी पालकांनाही दंड ठेवला. जर एखाद्या पालकाचा मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा १ रु. दंड ठेवला. शाहूंनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. कारण पाया पक्का असेल तरच माणसाची भावी शैक्षणिक प्रगती होऊ शकेल असे महाराजांचे मत होते.ते म्हणत, “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो.” शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी समजावून घेवून महाराजांनी त्यावर उपाय केले. मागास, गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व इतर सवलती दिल्या. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतीगृहे बांधली. कोल्हापुरात हायस्कूल व कॉलेजची स्थापना केली. राजाराम कॉलेज मध्ये मुलींची फी माफ केली. त्याकाळी काही शिक्षक अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील काही मुलांना व्हरांड्यात बसवत असत. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांना जरब बसेल असे उपाय केले. सरकारी शाळेत शिवाशिव पळू नये व सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवावे असा वटहुकूम काढला. ज्या शाळा या हुकुमाचे पालन करणार नाहीत त्यांची ग्रांट व इतर सवलती बंद करण्याची तंबी दिली.

वेदोक्त प्रकरण-
शाहू महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारा सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण होय. शाहू महाराजांचा भटजी राजोपाध्ये यांनी महाराजांना शूद्र मानून त्यांचे विधी वैदिक मंत्राने न करता पुराणोक्त मंत्राने करणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे महाराज दुखावले गेले. अनेक प्रकारे समाज देवूनही भटजी त्याची भूमिका सोडत नाही असे दिसताच महाराजांनी त्याचे इनाम जप्त केले. परिणामी वाद अधिकच चिघळला. टिळकांनीही केसरीमध्ये अग्रलेख लिहून सामाजिक न्यायाची बाजू न घेता भटजीची बाजू घेतली. आधीच महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमुळे ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद धुमसत होता.त्यात टिळक आणि महाराष्ट्रातील बहुतांशी ब्राम्हण महाराजांच्या विरोधात एकवटल्यामुळे ब्राम्हणेतर समाजही महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. परिणामी महाराष्ट्रात ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असे दोन गट पडले. ब्राम्हणांचे नेतृत्व टिळकांकडे तर ब्राम्हणेतरांचे नेते शाहू महाराज. परिणामी टिळक आणि शाहू राजे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. खरेतर शाहू महाराजांचे भांडण ब्राम्हणांविरुद्ध नव्हते तर त्यांच्या वर्चस्ववादी मानसिकतेविरुद्ध होते.विधी वैदिक मंत्राने केले काय किंवा पुराणोक्त मंत्राने केले काय ? काहीच फरक पडत नाही हे शाहू राजे जाणत होते. परंतु बहुजनांचे विधी वैदिक पद्धतीने न करण्यामागे ब्राम्हणांचा वर्णवर्चस्ववाद असल्याने शाहुनीही आपली भूमिका सोडली नाही. या घटनेनंतर शाहू राजांनी सामाजिक न्यायाच्या लढाईला अधिक बळकटी मिळवून दिली.

शाहू महाराजांचे आर्थिक धोरण-
शाहू महाराजांनी उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टीने खास प्रयत्न केले.कारागिरांना आश्रय दिला. आपल्या संस्थानात सुत गिरणी चालू केली.त्यासाठी मोठी जमीन मोफत दिली. इचलकरंजी येथे जिनिंग कारखाना सुरु केला. त्यानंतर इतर ठिकाणी अशा प्रकारचे कारखाने सुरु केले. उद्योगधंदे आणि व्यापार वाढीसाठी शाहूंनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. त्यांना राहण्यासाठी जमिनी दिल्या. बिनव्याजी कर्जे दिली. पाणीपुरवठ्याची मोफत सोय केली. रस्ते बांधले, रेल्वेच्या विकासास गती दिली. १८९५ साली शाहूपुरी ही व्यापारपेठ वसवण्यात आली.

राजर्षी शाहूंचा वारसा-
आज शाहू महाराजांचे काम बहुतांशी लोकांपर्यंत पोहचले आहे. शाहुराजांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे सर्वसामान्य बहुजनांच्या हृदयात शाहूंना आदराचे स्थान आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या जोडीला शाहू राजांचे नाव घेतले जाते. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा फार मोठा वाटा आहे.
आज शाहू महाराजांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु फक्त एवढे करून त्यांच्या विचार-कार्याचे चीज होणार नाही. शाहूंचा लढा हा समतेसाठी होता. आत्मसन्मानासाठी होता. वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्तीविरुद्ध होता. आज शाहू राजांच्या पश्चात त्यांचाच जयजयकार करणारे, त्यांच्या नावाने सत्ता भोगणारे राज्यकर्ते गरीब प्रजेला छळत आहेत. भ्रष्टाचार, गुंडगिरी या प्रवृत्ती फोफावल्या आहेत. शाहूराजे फक्त पुजण्यापुरतेच राहिले आहेत. त्यांचा वारसा, त्यांचे विचार, कार्य आपण विसरलो आहोत. राजर्षी शाहूंनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संस्थानात जनहितार्थ अनेक कायदे केले. प्रसंगी टीका, अपमान, बदनामी यांची पर्वा केली नाही. पण आजच्या राज्यकर्त्यांना ‘जादूटोणा व अघोरी प्रथाविरुद्ध कायदा’ करता येत नाही. राज्यकर्ते शाहूंच्या नावाने राजकारण करतात मात्र त्यांचा विचार जपताना कुणीच दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.


शाहूंच्या कार्याचे खरे चीज व्हावे असे वाटत असेल तर शिक्षण घेवून उच्च पदे हस्तगत केली पाहिजेत. आपल्या अधिकाराचा, पदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता केला पाहिजे. उपेक्षित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे ही शाहू राजांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया, हीच शाहुराजांना आदरांजली ठरेल.

पुतळ्यावरून वाद चालू आहे. इतिहासाची ..........

पुतळ्यावरून वाद चालू आहे. इतिहासाची पुनर्मांडणी करताना ऐतिहासिक घटना, पात्रे यांच्या सत्यासत्यतेवरून वाद निर्माण होणे साहजिक आहे. ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे जर कोणी मांडणी करत असेल तर तो भाग स्वीकारायला हरकत नाही. परंतु इथे प्रश्न आहे तो वाघ्या कुत्र्याचा. असा कुत्रा इतिहासात होवून गेला का नाही यावर बराच खल चालू आहे. हा वाघ्याचा पुतळा तुकोजीराव होळकरांच्या देणगीतून निर्माण झाल्यामुळे धनगर समाज्याच्या या पुतळ्याबद्दल अत्यंत पूज्य भावना आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने वाघ्याचा पुतळा उध्वस्त करण्याची घोषणा केल्यापासून धनगर समाज आणि त्यांचे नेते अस्वस्थ झाले आहेत. धनगर समाजाच्या या अस्वस्थतेतून त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या या भूमिकेला विरोध केला आहे. ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे जे सिद्ध होईल ते सत्य सर्वांनाच स्वीकारावे लागेल. परंतु संभाजी ब्रिगेडने पुतळा उध्वस्त न करता धनगर समाजाशी चर्चा करून विश्वासाने हा प्रश्न सोडवावा. नाहीतर मराठा विरुद्ध धनगर असा संघर्ष उभा राहायला वेळ लागणार नाही. आणि तसे झाले तर बहुजन चळवळीची हानी होईल. वाघ्या कुत्र्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील अग्रणी नेते श्री. रामभाऊ वडकुते झारगड मामा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ती सर्वांच्या माहितीसाठी सह्याद्री बाणा वर उपलब्ध आहे.
- प्रकाश पोळ 
रायगड किल्ल्यावरील शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याचा घाट संभाजी ब्रिगेडने घातला आहे. केवळ शिवचरित्रात वाघ्य्याच्या आस्तित्वाचे लिखित पुरावे सापडत नाहीत म्हणुन वाघ्याचे उच्चाटन करण्याचे त्यांचे हे प्रयत्न अत्यंत निंदनीय असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत असे पत्रक धनगर समाजातील अग्रणी नेते श्री. रामभाऊ वडकुते व झारगड मामा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

दंतकथा म्हणजे इतिहास नव्हे हे खरे असले तरी दंतकथांना सत्याच्या बीजाचा आधार असतो. सुप्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरीं यांनी केवळ कल्पनेच्या जोरावर वाघ्याचे पात्र निर्माण केले असा युक्तिवाद संभाजी ब्रिगेड करत आहे तो ग्राह्य धरता येणार नाही. दुसरे असे कि ज्या जागेवर हे स्मारक उभारले गेले आहे तेथे पुर्वी एक उद्ध्वस्त चौथरा होता. तो चौथरा शिवाजी महाराजांच्या कोणा राणीचे असल्याचाही उल्लेख इतिहासात नाही किंवा तशी दंतकथाही नाही.  अशा स्थितीत वाघ्याचा वाद पेटवून त्यावर राजकारण करून समाज-स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. बहुजन समाजामद्धे फुट पाडण्याची ही राजकीय चाल हाणुन पाडली जाईल असा इशारा त्यांनी या पत्रकात दिला आहे.

निधीअभावी  ज्यावेळी शिवस्मारकाचे काम अडुन पडले होते त्यावेळी मदत करायला पुढे सरसावले ते शिवप्रेमी तुकोजी महाराज.ही सर्वात महत्वाची बाब आज मुद्दाम दडवली जात आहे. शिवस्मारकासाठी एकमेव मोठी देणगी तुकोजीमहाराजांची आहे आणि त्या काळी त्यांनी शिवस्मारकाला रु. ५०००/- ची देणगी दिली. ही देणगी मागायला पुण्यातुन श्री. जी.व्ही. काळे आणि श्री ग.वि. केतकर इंदोरला गेले होते. त्याच वेळी  तुकोजीरावांच्या लाडक्या कुत्राचाही दुर्दैवाने म्रुत्यु झाला होता. तुकोजीराव दु:खात होते. त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांच्या लाडक्या कुत्र्याचेही स्मरण रहावे आणि स्वामीनिष्ठेचा गौरव केला जावा या दुहेरी हेतुने वाघ्या कुत्राचे स्मारक करण्याचे ठरवले गेले. त्यानुसार स्मारक समितीने शिवस्मारक पुर्ण झाल्यानंतर त्वरीत आदरपुर्वक वाघ्याचे स्मारक बनवले. हे स्मारक तुकोजीराजांच्या देणगीतुन झाले आहे असा स्पष्ट उल्लेख त्या स्मारकावर शिलालेखात आहे. म्हणजे या स्मारकावर पहिला हक्क होळकर घराण्याचा आहे. हे लक्षात न घेता झुंडशाहीने हे स्मारक हटवण्याची भाषा करणे निषेधार्ह आहे.

धनगर समाजासाठी कुत्रा हा दैवतासमान आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचा लाडका कुत्रा वाघ्या हाच आहे आणि त्याची पुजा केली जाते. तुकोजीराव हे धनगर समाजातले होते त्यामुळे त्यांना वाघ्याबद्दल आत्मीयता आणी पुज्यभाव असणे स्वाभाविक आहे. जर तुकोजीरावांना आपल्या कुत्र्याचे स्मारक बनवायचे असते तर त्यांनी त्याचेच नाव स्मारकाला दिले असते. परंतु त्यांनी ते शिवरायांच्या वाघ्याचे स्मारक बनवले, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

अशा स्थीतित वाघ्याचे स्मारक हटवण्याचा प्रयत्न केल्यास तो सर्व धनगर समाजाचा आणि समग्र ओ.बी.सी, भटके विमुक्त व तमाम शिवप्रेमींचा अवमान मानून त्याचा हे सर्व जण प्राणपणाने विरोध करतील असा इशारा आम्ही देत आहोत.

मराठा समाजातील इतिहासकार क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी १९०६ साली विस्त्रूत शिवचरित्र प्रकाशित केले. त्याच्या इंग्रजी, गुजराती व हिंदी अनुवादाचे खंड प्रकाशित करतांना त्यांना फार मोठे कर्ज झाले. "इतक्यात इंदोरचे उदार अधिपती श्रीमंत सवाई तुकोजीराव होळकर महाराजांच्या कानी क्रुष्णरावांची करुण कहानी गेली. खरोखर त्या काळात क्रुष्णरावांची स्थीति अत्यंत करुणाजनक झालेली होती. इतक्यात इंदोरापधीतिंची २४००० रुपयांची (आजचे सुमारे रु. ६० लाख) उदार देणगी देवून जगातील प्रमुख इंग्रजी ग्रंथालयांस फुकट वाटण्यासाठी इंग्रजी चरित्राच्या ४००० प्रती त्यांनी घेतल्या व त्या मुळ उद्देशानुरुप प्रमुख ग्रंथालयातुन ठेवण्याची व्यवस्था केली. अशा रीतिने क्रुष्णरावजी व्रुद्धापकाळी एका मोटःया काळजीतुन मुक्त झाले." (पहा-छत्रपती शिवाजी महाराज...ले. क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर, {प्रथमाव्रुत्ती...१९०६} ४थी आव्रुत्ती, वरदा प्रकाशन, पुणे-१६, प्रुष्ट क्र. नउ)

म्हणजे शिवचरित्र आणि शिवस्मारक या दोन्हींसाठी शिवप्रेमाने प्रेरीत होवून जे तुकोजीराजे पुढे आले त्यांचा अवमान करण्यासाठीच हा वाघ्याच्झा पुतळा काढुन टाकण्याची मागणी पुढे आली आहे हे लक्षात घेउन समग्र शिवप्रेमींनी याचा प्रतिकार केला पाहिजे. वाघ्याच्या पुतळ्याला हात जरी लावला गेला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडुन महाराष्ट्र पेटवू असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे.

या भारतभूमीत आपल्या प्राणांची बाजी लावून देशासाठी......

या भारतभूमीत आपल्या प्राणांची बाजी लावून देशासाठी लढणारे अनेक वीर जन्माला आले. आपल्या तळपत्या कर्तुत्वाने त्यांनी दाहीदिशा उजळून टाकल्या. परंतु त्यांच्या पश्चात त्यांचा इतिहास लिहिणाऱ्या बहुतांश इतिहासकारांनी प्रामाणिक इतिहास लिहिला नाही. खोट्या कथा, काल्पनिक प्रसंग, पात्रे यांची घुसावाघुसव करत अनेक महामानावांचा इतिहास बिघडवून टाकला. या महापुरुषांना आणि महान स्त्रियांना 
जातीच्या चष्म्यातून पाहत त्यांचा विकृत इतिहास लिहिला. मल्हारराव होळकर या सामान्य धनगराच्या मुलाने स्वकर्तुत्वावर मोठे राज्य निर्माण केले. अहिल्यामाई होळकर यांनी आपल्या लोककल्याणकारी कामाने संपूर्ण भारतभर आदर्श राज्य कसे असावे याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. अहिल्यामाई होळकर यांचे पती खंडेराव हे युद्धात मरण पावले. युद्ध करता करता मरण येवूनही खंडेराव यांना बदनाम केले. खंडेराव व अहिल्यामाई यांचे पुत्र मालेराव हे व्यसनी, माथेफिरू रेखाटले. तुकोजी होळकर, यशवंतराव होळकर यानीही आपल्या कार्याने सर्वांना प्रेरित केले आहे. या देशातील  क्रांतिकारक आणि अखेरचा सार्वभौम राजा असणारा यशवंतराव होळकर याच्या बलिदानाची काडीमात्र पर्वा न करता त्यालाही माथेफिरू रेखाटले. जणू काय होळकरांच्या खानदानालाच माथेफिरू बनण्याचा शाप होता.  होळकर घराण्यातील अनेकांनी सामान्य लोकांसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. तरीही त्यांच्या पदरी उपेक्षाच आली. 


एक अहिल्यामाई यांचे नाव घेण्यापुरतेच होळकरांचे कर्तुत्व आहे असे सर्वांना वाटते. तसा समज जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला आहे. खंडेराव, मालेराव, तुकोजी, यशवंतराव, विठोजी होळकर यांचा संघर्ष समाजासमोर आलाच नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे सांगताना आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेकडो उदाहरणे देतो, परंतु आम्हाला क्रांतिकारी भिमाबाई होळकर आठवत नाहीत. भिमाबाई कोण होत्या हेही आम्हाला माहित नाही. आणि जे माहित आहे ते चुकीचे माहित आहे. खंडेराव, मालेराव, यशवंतराव सारेच कसे काय माथेफिरू ठरतात ? आणि माथेफिरू असूनही आभाळालाही लाजवेल असे कर्तुत्व या महामानवानी गाजवले कसे ? हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे.

यापुढील काळात इतिहास लिहिताना या उपेक्षित क्रांतीकारी, बहुजन नायकांना न्याय देण्याचा प्रयत्न शिक्षित आणि जागृत बहुजन समाजाने केला पाहिजे. होळकर घराण्यातील कर्तुत्ववान पुरुष आणि स्त्रियांची खूप उपेक्षा झाली आहे. त्यांच्यावर इतिहास लेखकांनी आणि समाजाने अन्यायच केला आहे. त्यांचे वारसदार म्हणून नाव संगणारे आपण त्यांच्यावरील बदनामीचे कलंक पुसून टाकण्यासाठी प्रयत्न करत नाही हे दुर्दैव आहे. सध्या या बाबतीत एक उत्कृष्ट म्हणावा असा प्रयत्न जेष्ठ लेखक संजय सोनवणी यांनी केला आहे. भारतीय इतिहासातील एक अजरामर व्यक्तिरेखा असणारे यशवंतराव होळकर यांचे चरित्र सोनवणी यांनी रेखाटले आहे. यशवंतरावांचे चरित्र लिहीत असताना सोनवणी यांच्यासमोर काही प्रमुख अडचणी होत्या. आजपर्यंत यशवंतराव होळकर या माणसाचे जे चरित्र आपणाला माहित आहे ते म्हणजे लुटारू आणि पुणे जाळणारा यशवंतराव. पुण्याशी असणारे यशवंतरावांचे हे वैर सर्वज्ञात आहे. परंतु त्यामागील नेमकी कारणमिमांसा सोनवणी यांनी केली आहे. यशवंतराव यांच्यावर जो पुणे जाळल्याचा आरोप केला जातो तो धादांत खोटा आहे हे सोनवणी यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे सिद्ध केले आहे. पुणे जाळणे तर दूरच, सामान्य माणसाला कोणताही त्रास होता कामा नये असा आदेशच यशवंतराव यांनी काढला होता. पुणे युद्धाच्या दरम्यान शिंदे यांच्या एका सरदाराचा वाडा जाळण्यात आला होता. याव्यतिरिक्त पुणे जाळले हा अपप्रचार आहे हे सोनवणी यांनी पुरावे देवून मांडले आहे. यशवंतराव होळकर हे राजे बनायला सर्व बाजूंनी समर्थ असतानाही त्यांना सत्तेची कोणतीही लालसा नाही हे यशवंतरावांचे चरित्र वाचताना पदोपदी जाणवते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत होळकर संस्थानाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचे श्रेय यशवंतराव होळकर यानांच जाते. 

यशवंतराव हे मल्हारराव होळकर यांचे दत्तकपुत्र तुकोजीराव यांचे धाकटे पुत्र. त्यांचे मोठे बंधू विठोजीराव यांना पुण्यात हत्तीच्या पायाशी देवून ठार मारले. अतिशय क्रूरपणे केलेल्या विठोजीच्या हत्येला पुणेकर साक्षी होते. विठोजी होळकर यांचा काहीएक अपराध नसताना सत्तेच्या नशेत धुंद असणाऱ्या बाजीराव आणि त्याच्या साथीदारांनी विठोजीच्या हत्येचे फर्मान काढले. विठोजीला अपमानित करत साखळदंडांनी बांधून हत्तीच्या पायाशी सोडण्यात आले. पिसाळलेल्या हत्तीने विठोजीचा चेंदामेंदा करून टाकला. मानवतेला लाजवणारे हे कृत्य पुण्यनगरीत घडले. कोणाच्याही तोंडातून ब्र बाहेर पडला नाही. विठोजीच्या हत्येचा पुण्यात निषेध झालाच नाही. विठोजीच्या हत्येची बातमी यशवंतरावाला समजली आणि भावाच्या हत्येच्या बातमीने तो पेटून उठला. बाजीरावाची आणि त्याच्या साथीदारांची सत्तेची नशा उतरवण्यासाठी यशवंतराव पुण्यावर चालून आले. भ्याड बाजीराव पुणे सोडून पळून गेला. विठोजीच्या हत्येनंतर खरेतर यशवंतराव फार दुःखी झाले होते. तरीही त्यांनी बाजीरावाशी बोलणी करण्याची तयारी केली. परंतु यशवंतराव आपणाला जिवंत सोडणार नाही असे वाटल्याने चर्चेची सारी निमंत्रणे धुडकावून बाजीरावाने पलायन केले. पुण्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडून पळालेला बाजीराव इतिहासात खलनायक ठरत नाही, मात्र पुण्यातील सामान्य जनतेला कोणीही धक्का लावता कामा नये असा आदेश आपल्या सैन्याला देणारा, पदोपदी अपमान, अन्याय सहन करून या राष्ट्रासाठी, राष्ट्रातील सामान्य जनतेसाठी नेहमी चर्चेची तयारी ठेवणारा यशवंतराव खलनायक ठरला. इतका कि सकाळी उठल्यानंतर यशवंतरावाचे नावही घेवू नये असा प्रघात पडण्याइतपत. पुण्यावर होळकरी आली होती, म्हणजे यशवंतरावांनी पुणे बेचिराख करून टाकले अशी मांडणी केली गेली. पुणेकर यशवंतरावाविरुद्ध केलेल्या या अपप्रचाराला बळी पडले. अनेक वर्तमानपत्रे आजही हाच खोटा इतिहास प्रमाण मानून लेखन करत आहेत. 

नतद्रष्ट इतिहास लेखक आणि त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवणारे लोक यांनी जरी यशवंतरावाच्या स्मृतीना करपू दिले तरीही काही लोकांनी खरे यशवंतराव समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे. शाहीर अमर शेख म्हणतात,
" शिवराया मागं होळकर फक्त ऐकला
महाराष्ट्रध्वजा अति उंच उभारुनी गेला
नव इतिहासाचा नवा सत्य दाखला
अमरनें दिला ! मुजऱ्याला चला...
यशवंतराव होळकर बोला,
चांगभल बोला !!!!! "  

आजपर्यंत यशवंतरावाचे, त्यांच्या कार्यकर्तुत्वाचे निपक्षपाती मूल्यमापन क्वचितच झाले आहे. यशवंतराव होळकर हे भारतीय भूमीत जन्माला आलेला एक हिरा आहे. आजपर्यंत या हिऱ्यावर उपेक्षेची, जातीद्वेषाची राख जमा झाली होती. ही राख झटकून यशवंतरावांचे खरे आणि निर्मळ चरित्र समाजासमोर आले पाहिजे. ऐतिहासिक पुरावे, कागदपत्रांच्या आधारे खऱ्या इतिहासाची मांडणी झाली पाहिजे. हे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान बहुजन समाजाने स्वीकारले पाहिजे. अन्यथा त्यांच्या थोर महापुरुषांचा इतिहास असाच कलंकित केला जाणार. या पक्षपाती इतिहासाला नतदृष्ट इतिहासकार जेवढे जबाबदार आहेत तेवढेच आपणही जबाबदार आहोत. आपण कधी खऱ्या इतिहासाची आस धरली नाही हा आपला गुन्हा आहे. इथून पुढील काळात बुद्धीजीवी वर्गावर खरा आणि निपक्षपाती इतिहास लिहिण्याची जबाबदारी आहे. तो जर आप लिहिणार नसू तर भावी काळात आमच्या महापुरुषांना बदनाम केले म्हणून प्रस्थापित वर्गाच्या नावाने खडे फोडण्याचाही आपणाला अधिकार नसेल.

अधिक माहितीसाठी वाचा – 

अखेरचा सार्वभौम राजा : महाराजा यशवंतराव होळकर

महाराज यशवंतराव होळकर - यशवंत नायक मासिक

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर

यशवंतराव होळकरांनी पुणे ना जाळले ना लुटले...

विठोजीची क्रुरातिक्रुर हत्या...

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर

वैदिक राज्याभिषेक करुन घेणारे स्वतंत्र सार्वभौम राज्याचे निर्माते यशवंतराव होळकर

वैदिक राज्याभिषेक करुन घेणारे  स्वतंत्र सार्वभौम राज्याचे निर्माते यशवंतराव होळकर 
या राज्याभिषेकाची एक पार्श्‍वभूमी आहे. तुकोजीराजे होळकर यांच्या मृत्युनंतर इंदूरची गादी काशीराव या त्यांच्या ज्येष्ठ पुत्राला देण्याचा घाट दुसरे बाजीराव व दौलतराव शिंदे यांनी घातला होता. पण काशीराव हे एक तर अत्यंत अकार्यक्षम तर होतेच पण अधुही होते. पण त्यामुळे होळकरांची संस्थाने आपल्याला गिळंकृत करता येतील असा दौलतरावांचा होरा होता. यासाठी शिंद्यांनी खरा लायक वारसदार म्हणता येईल अशा दुस-या मल्हाररावांचा पुण्यात खून केला आणि विठोजी व यशवंतराव या कनिष्ठ बंधुंना जीव वाचवण्यासाठी पलायन करावे लागले. 
यानंतर शिंद्यांनी संपूर्ण होळकरी प्रांत घशात घातला व तेथे चिवेलियर डंडरनेक या फ़्रेंच सेनानीची नियुक्ती केली. दौलतरावांनी संपूर्ण उत्तरेसाठी जनरल पेरों या सेनानीची नियुक्ती केली होती तर डंडरनेक हा त्याच्याच अधिपत्याखाली इंदूरमध्ये ठाण मांडून बसला होता. अशा प्रकारे होळकरी संस्थाने पूर्णतया शिंद्यांच्या ताब्यात गेली होती. होळकरांचा सर्वच वारसा नाकारला गेला होता. पण यशवंतराव होळकरांनी खान्देशातील भिल्ल आणि पेंढार्‍यांच्या स्वतंत्र पलटनी उभारुन आपले परंपरागत राज्य प्राप्त करण्यासाठी संघर्ष सुरु केला. शिंद्यांच्या लष्कराशी अनेक लढाया करत त्यांनी एकेक महाल मुक्त करायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी महेश्‍वरवर चाल केली. तेथे डंडरनेकच्या सैन्याचा त्यांनी गनिमी काव्याने घनाघाती प्रहार करत पराभव केला. डंडरनेकचे कवायती सैन्य होते सहा हजार घोडदळ तर दहा हजार प्रशिक्षित पायदळ. यशवंतरावांकडे फक्त दोन हजार घोडदळ होते तर पाच हजार पायदळ. तोफ एकही नाही तर डंडरनेककडे ६0 तोफा होत्या. परंतु त्यांनी डंडरनेकचा सपशेल पराभव केला. शेवटी स्वत डंडरनेक शिंद्यांची सेवा सोडून यशवंतरावांच्या सैन्यात सामील झाला. ही घटना घडली डिसेंबर १७९८ मध्ये.
तत्कालीन स्थितीत राज्य जिंकले असले तरी जनमान्यतेसाठी एकतर पातशाही मान्यता लागे किंवा मराठा राजमंडळाचा सदस्य व्हायचे असेल तर पेशव्यांची. पेशव्यांविरुद्धच बंड करुन स्वतंत्र राज्य निर्माण केले असल्याने पेशवे तशी मान्यता, विनंत्या करुनही, देणे शक्यच नव्हते. शिंदे तर या मानहानीमुळे सुडसंतप्त झाले होते. (त्याचीच परिणती विठोजींच्या क्रूर हत्येत झाली.) यशवंतराव होळकर हे अनौरस आहेत असा प्रवाद तेंव्हा असल्याने पातशहाही त्यांना (जशी पेशव्यांना देत असे) तशी वस्त्रे यशवंतरावांना देणे शक्य नव्हते.
अशा स्थितीत सार्वभौम राजा होण्यासाठी, खरे तर ज्या तत्कालीन कारणांमुळे शिवरायांनाही राज्याभिषेक करुन घ्यावा लागला, त्याच कारणांमुळे यशवंतराव होळकरांनी ६ जानेवारी १७९९ रोजी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करुन घेतला. स्वत:चे राजचिन्ह आणि मुद्रा घोषित केली.
विस्मृतीत गेलेला पण इतिहासातील मोलाची घटना असलेला होळकरांचा राज्याभिषेक सोहळा यंदापासून मोठ्या प्रमाणावर त्यांचे जन्मस्थान, वाफगांव (ता. राजगुरुनगर) येथील किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानाने उर भरुन यावा अशा घटनेचा उत्सव साजरा व्हायलाच हवा!
- संजय सोनवणी

Friday 29 November 2013

महाराष्ट्रावर प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारी दोनच घराणी. .......

महाराष्ट्रावर प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारी दोनच घराणी. पैकी सर्वात प्रथम सातवाहन. त्यांनी साडेचारशे वर्ष सत्ता गाजवत महाराष्ट्र घडवला. सातवाहन हे मुलचे धनगर. दुसरी प्रदीर्घ काळ टिकलेली अत्यंत महत्वपुर्ण सत्ता म्हणजे देवगिरीच्या यादवांची. ही सत्ता साडेतिनशे वर्ष (सन ८३५ ते १३१८) टिकली. नुसती टिकली एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीवर अमिट परिणाम सोडला. यादव हे मुळचे अहिर गवळी. म्हणजेच तेराव्या शतकापर्यंत धनगर-गवळ्यांनीच महाराष्ट्रावर सत्ता गाजवली. एक संस्कृतीचे निर्माण घडवले. आजही महाराष्ट्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या त्याच संस्कृतीचे अनुसरण करत आहे. पण फरक एवढाच आहे कि या दोन्ही समाजांना आजच्या संस्कृतीत जवळपास स्थान नाही.
इतिहासकारांनी सातवाहन व यादवांचा इतिहास फारसा लिहिलेला नाही. जोही लिहिला आहे तो जातीय दृष्टीकोनातुन लिहिलेला आहे. सातवाहनांच्या कुळाबद्दलही अकारण विओवाद निर्माण करुन ठेवला आहे. असो.

यादवांची सत्ता गेली आणि इस्लामी सत्ता आली. या काळापासुन मराठी संस्कृतीचे क्रमश: अध:पतन सुरु झाले. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेचे स्तोम वाढु लागले होतेच. धनगर-गवळी हे व्यवस्थेने शुद्रांत जमा करुन टाकले होते. असे असले तरी चवदाव्या शतकाच्या अखेरपर्यंत हे दोन्ही समाज आर्थिक दृष्ट्या बलाढ्य असेच होते.

परंतु प्रकृतीला कदाचित ही संपन्नता मंजुर नव्हती. महाराष्ट्रात १३९६ ते १४०८ या काळात एक भिषण दुष्काळ पडल्याची नोंद आहे. तत्पुर्वीही अनेक पडले असतील पण दुर्दैवाने त्यांची नोंद नाही. या उपरोल्लिखित दुष्काळास दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणुन ओळखले जाते. या दुष्काळात स्थिती एवढी भिषण होती कि गांवेचा गांवे ओस पडली. लाखो जनावरे, माणसे अन्न-पाण्याअभावी या दुष्काळात मरण पावली. लोक झाडांच्या साली, म्रुत जनावरे खावु लागली. शेवटी वेळ अशी आली कि माणसे मृत माणसांनाही खावु लागली.

१५९६ सालीही असाच भिषण दुष्काळ भारतभर पडला होता. अबुल फजल लिहितो कि "माणुस माणसाला खात होता आणि लहान मोठे रस्ते प्रेतांनी बंद केले होते."
त्यानंतरही १७व्या शतकात पडलेल्या लहान-मोठ्या दुष्काळांचे वर्णन मोरल्यंड या संशोधकाने केले आहे. १६१४ ते १६६० या काळात असे १२ दुष्काळ पडले होते. त्यात सर्वात मोठा दुश्काळ होता १६३० सालचा. हा त्यंत उग्र स्वरुपाचा असुन या दुष्काळाबद्दल व्ह्यन ट्विस्ट हा डच व्यापारी लिहितो:
"पाउस इतका अल्प पडला कि पेरणी केलेले बी वाया तर गेलेच, पण गवतही उगवले नाही. गुरे ढोरे मेली. शहरांतुन आणि खेड्यांतुन, शेतात आणि रस्त्यांवर प्रेतांच्या राशी पडल्याने इतकी दुर्गंधी सुटली रस्त्यावरुन जाणे भयावह होते. गवत नसल्याने गुरे-ढोरेही प्रेतेच खावु लागली. माणसे प्राण्यांची प्रेते खायला येवु लागली. दुष्काळाची तीव्रता वाढु लागली तशी माणसे शहरे व खेडी सोडुन निराशेने दाही दिशा भटकु लागली....जेथे जावे तेथे प्रेतांशिवाय आम्हाला काहीच दिसत नव्हते... "पुरुष बायका-मुलांना टाकुन जात होते. स्त्रिया स्वत:ला गुलाम म्हणुन विकुन घेत, आया बालकांची विक्री करत. काही कुटुंबांनी विष प्राशन करुन एकत्रीत म्रुत्युला कवटाळले....माणसांचे मांस उघडपणे बाजारात विकले जात होते..." या सतत पडलेल्या दुष्काळांनी कुणब्यांना जेवढे हवालदिल केले त्याहीपेक्षा अधिक पशुपालकांची भिषण अशी ससेहोलपट केली. पशुंना जगवणे अशक्य झाले. चारा नाही कि पाणी नाही. अन्नान्न करत माणसेच जेथे मरत होती तेथे मुक्या शेळ्या-मेंढ्या, गायी-म्हशींचा काय पाड लागणार? या दुष्काळांनी धनगर-गवळ्यांचा आर्थिक कणाच मोडुन टाकला एवढे मात्र खरे. सारी अर्थव्यवस्था कोलमडुन पडली. त्यात सुलतानी प्रहार होतच होते. धर्म नष्ट व्हायच्या बेतात आलेला. सुकाळ आल्यावर शेती पुन्हा उमलु लागली हे खरे, पण पशुंची पुन्हा नव्याने पैदास करत उभारी धरायला पशुपालकांना मात्र वेळ लागला. ते मागे पडु लागले. पुर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त करता येणे जवळपास अशक्यच झाले.
शेतक-यांनी नदी-ओढ्याकाठच्या जमीनी व्यापल्या होत्या. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता बघता ते संयुक्तिकही होते. धनगरांनी मात्र चा-यासाठी व्यापलेल्या जमीनी या जवळपास ओसाड, गवताळ आणि डोंगराळ होत्या. त्यामुळे पावसाळी काळ सोडला तर दुसरे पीक घेता येणे अशक्यच होते. आजही या स्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे धनगर समाज हा निमभटकाच राहिला. म्हणजे पानकळ्यात धनगर वाड्यात थांबुन जमेल तेवढे कसायचे आणि पानकळा संपला कि चा-याच्या शोधात शेळ्या-मेंढ्यांचे कळप घेवून चारी दिशा फिरत रहायचे.
पण यामुळे धनगर समाजाचा एक अप्रत्यक्ष फायदाही झाला. महाराष्ट्रातील दुर्गमातिदुर्गम प्रदेश त्यांनी पायतळी तुडवला असल्याने हाताच्या रेषांइतकाच महाराष्ट्र त्यांना तोंडपाठ झाला. आज जे डोंगरी गड-कोट-किल्ले महाराष्ट्रात दिसतात त्या जागा शोधण्याचे श्रेय धनगरांकडेच जाते. आजच्या बोरघाटाचा मार्गही शिंग्रोबा नामक धनगरानेच इंग्रजांना दाखवला. रायगडावरील हिरकणी बुरुजाची कथा कोण विसरेल? हिरकणी ही धनगरच. अभेद्य अशा समजल्या जाणा-या रायगडावरील चोरवाटही तिला माहित होती. छ. शिवाजी महाराजांनी तिचा यथोचित सन्मान करुन ती चोरवाट बंद करण्यासाठी बुरुज बांधला. तो आजही हिरकणी बुरुज म्हणुन ओळखला जातो.
धनगरांनी राजसत्तांना केलेली मोलाची मदत म्हणजे हेरगिरी. सतत भटकंती असल्याने व चा-यासाठीच हिंडत असल्याने शत्रुमुलुखातील हालचाली त्यांना आपसुक कळत. छ. शिवाजी महाराजांनी नुसत्या गडकोटांसाठी नव्हे तर हेरगिरीसाठीही त्यांचा उपयोग करुन घेतला...पण सर्वात महत्वाचा उपयोग म्हनजे गनीमी कावा.
आधीच सांगितल्याप्रमाणे दुर्गमातिदुर्गम भागांतील वाटा-चोरवाटाही त्यांना तोंडपाठ असल्याने शत्रुवर छापा मारण्यासाठी वाटाडे असत ते धनगरच. कुत्र्यांचा उपयोग अशा छाप्यांत कसा करुन घ्यायचा हे शिकवले ते धनगरांनीच. "Native Breeds of India-Mudhol" या प्रबंधात डा. बी. सी. रामचंद्रन आणि डा. पी. व्ही. यतिंदर म्हणतात कि गनीमी काव्याने शिवाजी महाराज जेंव्हा छापा टाकण्यास जात तेंव्हा आधी प्रशिक्षीत कुत्र्यांची फौजच शत्रुच्या छावणीवर तुटुन पडे. शत्रुच्या गोटात धावपळ व्हायला लागली कि मग मावळे तुटुन पडत व शत्रुची कत्तल करत. औरंगझेबाने या पद्दतीच्या हल्ल्यांची दहशत घेतली होती असेही या लेखकद्वयाने नमुद करुन ठेवले आहे. थोडक्यात स्वराज्याच्या उभारणीत धनगर समाजाने महत्वाचे योगदान दिले. अर्थात या योगदानाचा विसर आपल्या इतिहासकारांना पडला. सामाजिक इतिहास हा मुळात मराठीत लिहिला गेलाच नसल्याने असे घडले हेही खरे.
सतत निसर्गाच्या सहवासात, एकाकी खुल्या आभाळाखाली रहायची सवय यामुळे धनगरांच्या दृष्टीकोनात व्यापकता येणे स्वाभाविक होते. सातवाहन, यादवांनी ती व्यापकता दाखवलेली होतीच. या दोन्ही समाजांचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय दृष्टी. आणि तिची मध्ययुगात चुणुक दाखवली ती मल्हारराव होळकरांनी. खानदेशात राहुन मल्हाररावांनी माळव्यावर स्वतंत्रपणे स्वा-या करत मोगल सत्तेला हादरे द्यायची सुरुवात अवघ्या पाचशे बारगीर-शिलेदारांच्या सैन्यासह सुरु केली. बाळाजी विश्वनाथाच्या दिल्ली स्वारीत स्वतंत्रपणे सहभाग घेतला. मल्हाररावांच्या पराक्रमी व स्वतंत्र वृत्तीची जाणीव याच कालात बाजीरावाला झाली. त्याने पेशवा होताच मल्हाररावांना माळव्याचा सुभेदार म्हणुन नेमले. मराठेशाहीतील सुभेदार पद दिले गेलेले एकमेव सेनानी म्हणजे मल्हारराव. मल्हाररावांनी उत्तर तुडवली. सपाट प्रदेशातील गनीमी कावा विकसीत केला...इतका कि त्याला "मल्हारतंत्र" म्हटले जाते. पानिपत युद्धात गेलेली मराठेशाहीचे पत काही महिन्यांत परत मिळवली. इंग्रजांनाही गनीमी काव्यानेच धुळ चारली. राष्ट्रीय दृष्टीची सकारात्मक बाजु दाखवणारी दुसरी महान स्त्री म्हणजे अहल्यादेवी. त्यांनी रामेश्वरपासुन ते काश्मीरपर्यंत आणि पेशावर पासुन बंगालपर्यंत जेवढी समाजोपयोगी वास्तुंची, मंदिरांची जीर्णोद्धार ते नवनिर्मिती करत महान राष्ट्रीय कार्य केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. १८०२ पासुन यशवंतराव होळकरांनी इंग्रजांचा धोका ओळखत त्यांच्या विरुद्ध एकहाती स्वातंत्र्यलढा उभारला. अठरा युद्धे केली आणि सर्व युद्धांत विजय मिळवला. दुर्दैवाने त्यांच्यावर मृत्युने अकाली घाव घातला. पण त्यांची पत्नी तुळसाबाई यांनी इंग्रजांना तब्बल सात वर्ष आपल्या राज्यापासुन दुर ठेवले. शेवटी इंग्रजांनी फितुरीचा फायदा घेत तुळसाबाईंचा खुन केला तेंव्हाच त्यांना होळकरी राज्याचा घास घेता आला. पुढे तरीही भिमाबाईने गनीमी काव्याचाच वापर करत इंग्रजांशी युद्ध सुरुच ठेवले. आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी म्हणुन जागतीक इतिहासात त्यांचे नांव नोंदले गेले आहे...अर्थात आम्हाला त्याचे फारशी पर्वा नाही. खुद्द मल्हाररावांसारख्या मुत्सद्दी सेनानीला "धनगर" म्हणुन त्यांच्या कालात हिनवले जात होते...तर इतरांची काय कथा?
होळकरी युगात धनगरांनी युद्धशास्त्रात प्रगती केली. संताजी वाघांसारखे...भाऊसाहेब पेशव्यांना वाचवण्यासाठी बलिदान देणारे महान सरदार झाले...पण सामाजिक परिप्रेक्षात धनगरांचे स्थान तीळमात्र बदलले नाही...
(क्रमश:)

संजय सोनवणी
९८६०९९१२०५

महाबळेश्वर हे मुळचे महाबळे आडनावाच्या धनगर समाजाचे -

महाबळेश्वर हे मुळचे महाबळे आडनावाच्या धनगर समाजाचे -
महाराष्ट्राचे थंड हवेचे ठिकाण म्हणून क्षेत्र महाबळेश्वर प्रसिद्द आहे, गावाचे मूळ नाव महाबळेश्वर हे महाबळे या धनगर आडनावाचे होते, महाबळे या आडनावाचा धनगर समाज हा मुळचा महाबेश्वरचा . नंतर इथे इतर धनगर समाज पण वसला ती आडनावे आहेत ढेबे,आखाडे,हिरवे.तसेच या समाजाची डोंगर रानाला शेती पण खूप मोठ्या प्रमाणात आहे.हि लोके प्रमुक्याने स्टॅनबेरीज, रासबेरीज ची लागवड करतात, आणि जेम च्या कारखान्यांना पुरवठा करतात.

इतिहास- इ.स १२१५ मध्ये सिंघन या देवगिरीच्या यादव राजाने कृष्णा नदीच्या उगमाजवळ एक मंदिर आणि पाणी पिण्याचे जलकुंड बांधले. तसेच या परिसराच्या जवळ प्रतापगड हा प्रेक्षणीय किल्ला आहे.

नंतर च्या काळात येथील वातावरण आणि निसर्ग श्रुष्टी पाहून ब्रिटीश सरकारने याला हिल स्टेशन चा दर्जा दिला,

येथील महाबळेश्वराचे देऊळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. अफझल खानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते.सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.
महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरान प्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंर्टस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंर्ट, आर्थर सीट पॉइंर्ट, लॉडनिग पॉइंर्ट हे त्यापैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.
महाबळेश्वराच्या मंदिरात येथुन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.
येथील स्टॅनबेरीज, रासबेरीज, जांभळं, लाल रंगाची मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो. —
info by मनजित रायभान कोळेकर

Friday 30 August 2013

महाराष्ट्रात लोकसंख्येने क्रमांक एकवर असणा-या धनगर समाजाचे राजकारणाकडे अक्षम्य दर्लक्ष झालेले आहे .राजकारण फार वाईट असते. राजकारण म्हणजे गजकरण. असा समज धनगरांचा झाल्यामुळे वा केल्या गेल्यामुळे ही जमात राजकारणातून जवळपास पुर्णतः बाद होण्याच्या मार्गावर आहे. 
राजा बनण्यासाठी जे केले जाते तेच राजकारण .हेच मुळात तो विसरून बसलेला आहे.राजकारण हे सत्ता व पद प्राप्तीसाठी करायचे असते .
राजकारणाचा सरळ संबंध हा शासन संस्थेशी असतो. सत्ता कोणासाठी आणि कशासाठी राबवायची हे ठरवण्याशी असतो. निर्धारित उद्दिष्टे गाठण्यासाठी असतो.
राजकारण हे मानव समाजाचे अभिन्न अंग आहे. समाजाचा गाढा सुरळीत चालवण्यासाठी निर्माण केलेल्या शासनसंस्थेवर राजकारणाचा प्रचंड प्रभाव पडतो. जो व्यक्ती व समाज, ज्या संस्था व संघटना राजकारणा पासुन दूर राहतात ; एक तर ते राजकारण व समाजकारण या दोन्हीच्या प्रवाहा बाहेर फेकले जातात. दुसरे षंढत्वामुळे नवनिर्मिती तर होणे शक्य नाही. अशावेळी हात
बडवत बसण्यापलिकडचा ऊद्योग ते करू शकत नाहीत. एकंदरित राजकारणा पासुन दर राहणे वा नकारात्मक दृष्टिकोन जोपासणे हा षंढत्वाचा आजार आहे. कल्याणकारी समाज व राज्य निर्मितीची संकल्पना शासन संस्थेत सहभागी होऊनच ती पूर्ण करता येते.
शासन आणि प्रशासन या दोन्हीचा ताबा मिळवण्यासाठी धनगरांनी सिद्ध झाले पाहिजे. केवळ प्रतिक्रीयावादी बनू नये तर प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.
होमेश भुजाडे
नागपूर
9422803273

Thursday 29 August 2013

ब्राह्मण हेच हिंदू धर्माचे कर्णधार आहेत. हिंदू धर्माला ते आपली जहांगीर समजतात. म्हणूनच या धर्माला मनमानी पद्धतीने आपल्या हित रक्षणासाठी स्वार्थीपणाने आजपर्यंत राबवत आलेले आहेत.स्वजातीय व उच्चवर्णीय विकासापलीकडे हिंदू धर्मीय म्हणून इतर शूद्रातिशूद्र जातीच्या विकासासाठी यांनी कवडी मोलाचे देखील काम केलेले नाही. अलिकडे सेवाभावी काम केल्याचा कांगावा संघपरिवारातील संघटना करत असल्या तरी त्यांचा हेतू हिंदुत्वाची प्रयोग शाळा म्हणून हिंसा माजवण्यासाठीच आसतो हे आजपर्यंत सिद्ध झालेले आहे.
बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.धनगर -बहुजन राष्ट्रीय समाजावर हिदुत्व लादण्याचा संघ परिवार जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. मंदिर - मशिदीच्या नावावर हिंदू -मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवित आहेत. धर्मांतरणाच्या नावावर ख्रिश्चनांच्या विरूद्ध रक्ताची होळी खेळत आहेत. कपोलकल्पीत देवदेवतांना, निर्थक कर्मकांडांना व नितीभ्रष्ट धर्माचार्यांना अतिशय महत्त्व दिल्या जात आहे. ही बुवा, बापू, महाराज, अम्मा, देवी, साध्वी आदी मंडळी लाखो रूपयांची उधळण करून प्रवचन व सत्संग यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने धार्मिकतेचे प्रदर्शन करून,' ब्राह्मणी हिंदुत्व ' बहुजनांनवर बिंबवित आहे. ही सर्व धर्माचार्य हिंदुत्वाचे सेनापती आहेत. भौतिक प्रगती पेक्षा आध्यात्मिक प्रगती श्रेष्ठ आहे. असे वांझोटे तत्वद्न्यान बहुजनांच्या गळी उतरवतात . आणि स्वतः माञ भौतिक सुखाच्या पंचतारांकित ऐश्वर्यात लोळतात. अशा स्वार्थांध व धर्मांध संत -महंतांचे अलिकडे पेवच फुटलेले आहे. सर्व TV चँनल्सवर यांचाच बोलबाला असून संविधानातील वैद्न्यानिक दृष्टिकोन रूजवण्याचे स्पष्ट संकेत रोज पायदळी तुडवल्या जात आहे. यापासून धनगर- बहुजनांनी सावध राहिले पाहिजे.म. गौतम बुद्ध हे मुलतः पशुपालक धनगर वंशातीलच आहेत.'गौतम 'हा संस्कृत शब्द असून पाली भाषेत बुद्धास गोतम असेच रूप वापरलेले आहे. 'गोतम ' हे बुद्धाच्या घराण्याचे नाव असून वाडवडिलांपासून वंशपरंपरेने ते चालत आलेले आहे.सिद्धार्थाचे वडील सुद्धा गोतमच होते. गोतम हा शब्द गो + तम या शब्दापासुन बनलेला आहे. गो म्हणजे गाय आणि तम म्हणजे विपूल प्रमाणात. म. गौतम बुद्ध व त्यांचे वंशज गायींचे म्हणजेच पशुंचे मोठ्या प्रमाणात पालन करत असल्यामुळे त्यांना गोतम म्हटल्या जात होते. वैदिक ब्राम्हणांच्या यद्न्यातील गोहत्येला प्राचीन काळी विरोध करण्यामध्ये सिद्धार्थ अग्रस्थानी होते. त्याचे कारण ' गोतम ' या शब्दात दिसते.जेव्हा -जेव्हा कोणत्याही शोषणाच्या व्यवस्थेविरूद्ध बोलले वा लिहिले तर ती गरळ ओकणे नव्हे. तर शोषणाच्या विविध पैलूंना उजागर करणे होय.मी स्वतः या शोषणा पासून मुक्त झालो असे म्हणना-यांनी समाजास मुक्त करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. केवळ मी मानत नसण्याचा स्वार्थी आनंद नको.मराठ्यांच्या राजकिय शोषणाबद्दल बोलल्यास टाळ्या पिटणारे, ब्राम्हणांनी केलेल्या शोषणाबद्दल बोलताच टाळके पिटवत बसतात ; हे कोणत्या रसायना पोटी ?
शोषण हे शोषणच असते मग ते कोणत्याही जाती - धर्माने केलेले असो .ज्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा बनू नये म्हणून धर्मांध पक्ष आणि संघटना ऐडी - चोटीचा जोर लावत असतांना हिंदुत्वाचे वाहक बनलेल्यांनी कायद्याची भाषा करू नये .भारतीय समाजात
वैद्न्यानिक दृष्टिकोन रूजवण्याचे राष्ट्रकार्य सोडून प्रचार प्रसार माध्यमांमध्ये अंधश्रद्धेचा महापुर वाहतांना पाहून मन विषण्ण होते. तेव्हा ही माध्यमे कोणाची हस्तक म्हणून काम कर
शोषण हे शोषणच असते मग ते कोणत्याही जाती - धर्माने केलेले असो .ज्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा बनू नये म्हणून धर्मांध पक्ष आणि संघटना ऐडी - चोटीचा जोर लावत असतांना हिंदुत्वाचे वाहक बनलेल्यांनी कायद्याची भाषा करू नये .भारतीय समाजातवैद्न्यानिक दृष्टिकोन रूजवण्याचे राष्ट्रकार्य सोडून प्रचार प्रसार माध्यमांमध्ये अंधश्रद्धेचा महापुर वाहतांना पाहून मन विषण्ण होते. तेव्हा ही माध्यमे कोणाची हस्तक म्हणून काम करतात हे दिसून येते
नागपूर 
होमेश भुजाडे

Sunday 28 July 2013

मानवांचे अहित करून स्वस्वार्थ साधणारे जातीयवादी, धर्मवादी, आतंकवादी, नक्षलवादी असोत किंवा दरोडेखोर, भ्रष्टाचारी, बलत्कारी, खुनी, दंगली घडविणारे, फसवणूक, भेसळ करणारे असोत हे सर्वच कोणत्या ना कोणत्या धर्माला व ईश्वराला मानणारेच असतात. त्यांची देवा -धर्मावर असिम श्रद्धा असते. तेंव्हा धर्मावर प्रेम करणारे धार्मिक आणि देवावर श्रद्धा असणारे श्रद्धाळू चांगले संसंकारित असतात, मानवतावादी असतात असे कोणत्या प्रमाणाच्या आधारावर म्हणावे ? 
जे ईश्वरास मानतात. त्यावर अतुट श्रद्धा ठेवतात . त्यास राञंदिवस भजतात -पुजतात. ते सर्व जीवनात सदासर्वकाळ सुखी व आनंदी असतात आणि असे न करणारे दुःखी असतात याचे आधारभूत प्रमाण तरी कोणते ?
अपघाताने, विविध दुर्धर लहान मोठ्या आजाराने ग्रस्त असणारे ९९.९९% रोगी हे ईश्वरावर धर्मावर , अध्यात्मावर दृढ श्रद्धा ठेवणारे असूनही दवाखान्यात भरती का असतात ? नैसर्गिक आपत्तीत मरणारे व पंगुत्व आलेले निराळेच.
ज्या व्यक्ती कोणत्याही देव -धर्माला मानीत नाहीत त्यांना नास्तिक व धर्मद्रोही ठरविल्या जाते. परंतु अशी व्यक्तीच निस्वार्थी व ख-या अर्थाने मानवतावादी असतात. जेव्हा -जेव्हा व्यक्ती ही देवाची व धर्माची नाळ तोडत जाते ; तेव्हा - तेव्हा ती अधिकाधिक मानवाच्या जवळ जाते आणि ख-या अर्थाने मानवतादी बनत असते .

भारतात जेवढ्या शाळा नाहीत त्यापेक्षा कितीतरी पटीने गावोगावी मंदिरांची भरमार आहे. भारताची प्रगती खरंच मंदिरं बांदल्याने होणार की शाळा बांधल्याने ? भारताचे भविष्य घडवणा-या शाळा -विद्यार्थ्यांना ऊन - वारा - पाऊस यांची झळ ; आणि देवांसाठी व बुवा, बापू, साध्विंसाठी पंचतारांकित मंदिरं व आश्रम ही या देशाची विसंगती. सर्वच धर्मांच्या धार्मिक स्थळांवर शासनाने 80G नुसार कर सवलत न देता त्यावर कर आकारायला हवा.तो पैसा त्या त्या धर्मातील लोकांच्या कल्याणासाठी खर्च करायला हवा.
मानवाच्या सर्वांगीण ऊन्नती साधण्याचा प्रथम मार्ग शिक्षण होय. म्हणून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. निरक्षरता ही राष्ट्र -हासाचे धोतक आहे ना की प्रगतीचे.
निर्जीव दगडांच्या मुर्तीसाठी मंदिरं बांधण्याऐवजी जिवंत ह्रदयाच्या मानवांच्या अपत्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शाळा बांधा ! देवाचे भक्त बनण्यापेक्षा विद्येचे उपासक व्हा !

होमेश भुजाडे
नागपूर 


Friday 26 July 2013


क्या आप यकीन कर सकते हैं कि गुलाम भारत में अंग्रेज सरकार को कोई भारतीय महाराजा कर्ज भी दे सकता है।
वो भी थोड़ा-बहुत नहीं पूरे एक करोड़ रुपए का। जी हां यह पूरी तरह सच है और इतिहास के पन्नों में दर्ज भी है।
इंदौर के होलकर राजवंश के महाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय ने ब्रिटिश गर्वनर को इंदौर के आसपास रेलवे के तीन सेक्शन को जोडऩे के लिए रेलवे लाइन बिछाने के लिए एक करोड़ रुपए का कर्ज दिया था।ब्रिटिश गर्वनर ने महाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय से 1869 में एक करोड़ रुपए का कर्ज लिया था।25 मई 1870 को शिमला में वायसरॉय और गर्वनर जनरल इन कौंसिल ने इस समझौते पर मुहर लगाई थी।पूरे जिले में रेलवे लाइन की कुल लंबाई 117.53 किमी थी। जो रेलवे के तीन सेक्शन इंदौर-खंडवा, इंदौर-रतलाम-अजमेर और इंदौर- देवास-उज्जैन में बंटी थी।होलकरों से कर्ज लेने के बाद अंग्रेजों ने 1869 में खंडवा-इंदौर रेलवे लाइन का निर्माण किया। बाद में इस रेललाइन को होलकर स्टेट रेलवे कहा जाने लगा।इंदौर में टेस्टिंग के लिए पहला रेलवे इंजन हाथियों द्वारा खींचकर ट्रैक तक लाया गया था।1877 में रेलवे पूरी तरह काम करने लगी थी।
महाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय मध्य भारत के पहले ऐसे शासक थे जिन्होंने रेलवे की स्थापना और उसके लाभ को समझते हुए दक्षिण और उत्तर भारत को जोडऩे के लिए रेलवे ट्रैक बनाने हेतु धन मुहैया कराया।
महाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय के 42 वर्ष लंबे शासन काल में इंदौर स्टेट ने अधोसंरचना के मामले में जबरदस्त विकास और समृद्धि हासिल की1877 में रेलवे पूरी तरह काम करने लगी थी।महाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय मध्य भारत के पहले ऐसे शासक थे जिन्होंने रेलवे की स्थापना और उसके लाभ को समझते हुए दक्षिण और उत्तर भारत को जोडऩे के लिए रेलवे ट्रैक बनाने हेतु धन मुहैया कराया।
महाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय के 42 वर्ष लंबे शासन काल में इंदौर स्टेट ने अधोसंरचना के मामले में जबरदस्त विकास और समृद्धि हासिल कीमहाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय मध्य भारत के पहले ऐसे शासक थे जिन्होंने रेलवे की स्थापना और उसके लाभ को समझते हुए दक्षिण और उत्तर भारत को जोडऩे के लिए रेलवे ट्रैक बनाने हेतु धन मुहैया कराया।महाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय के 42 वर्ष लंबे शासन काल में इंदौर स्टेट ने अधोसंरचना के मामले में जबरदस्त विकास और समृद्धि हासिल कीमहाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय के 42 वर्ष लंबे शासन काल में इंदौर स्टेट ने अधोसंरचना के मामले में जबरदस्त विकास और समृद्धि हासिल की


यह कर्ज 101 वर्ष के लिए 4.5 प्रतिशत वार्षिक ब्याज पर दिया गया था। जमीन पूरी तरह नि:शुल्क मुहैया कराई गई थी।