Friday, 30 August 2013

महाराष्ट्रात लोकसंख्येने क्रमांक एकवर असणा-या धनगर समाजाचे राजकारणाकडे अक्षम्य दर्लक्ष झालेले आहे .राजकारण फार वाईट असते. राजकारण म्हणजे गजकरण. असा समज धनगरांचा झाल्यामुळे वा केल्या गेल्यामुळे ही जमात राजकारणातून जवळपास पुर्णतः बाद होण्याच्या मार्गावर आहे. 
राजा बनण्यासाठी जे केले जाते तेच राजकारण .हेच मुळात तो विसरून बसलेला आहे.राजकारण हे सत्ता व पद प्राप्तीसाठी करायचे असते .
राजकारणाचा सरळ संबंध हा शासन संस्थेशी असतो. सत्ता कोणासाठी आणि कशासाठी राबवायची हे ठरवण्याशी असतो. निर्धारित उद्दिष्टे गाठण्यासाठी असतो.
राजकारण हे मानव समाजाचे अभिन्न अंग आहे. समाजाचा गाढा सुरळीत चालवण्यासाठी निर्माण केलेल्या शासनसंस्थेवर राजकारणाचा प्रचंड प्रभाव पडतो. जो व्यक्ती व समाज, ज्या संस्था व संघटना राजकारणा पासुन दूर राहतात ; एक तर ते राजकारण व समाजकारण या दोन्हीच्या प्रवाहा बाहेर फेकले जातात. दुसरे षंढत्वामुळे नवनिर्मिती तर होणे शक्य नाही. अशावेळी हात
बडवत बसण्यापलिकडचा ऊद्योग ते करू शकत नाहीत. एकंदरित राजकारणा पासुन दर राहणे वा नकारात्मक दृष्टिकोन जोपासणे हा षंढत्वाचा आजार आहे. कल्याणकारी समाज व राज्य निर्मितीची संकल्पना शासन संस्थेत सहभागी होऊनच ती पूर्ण करता येते.
शासन आणि प्रशासन या दोन्हीचा ताबा मिळवण्यासाठी धनगरांनी सिद्ध झाले पाहिजे. केवळ प्रतिक्रीयावादी बनू नये तर प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.
होमेश भुजाडे
नागपूर
9422803273

No comments:

Post a Comment