Sunday 29 December 2013

भारताची पहिली महिला स्वातंञ्यसेनानी, स्ञी शौर्याची महानायिका भीमाई होळकर

भारताची पहिली महिला स्वातंञ्यसेनानी, स्ञी शौर्याची महानायिका जिचा जन्म होळकर राजवंशात झाला .भारताचे प्रथम स्वातंञ्यवीर राजे यशवंत (प्रथम) यांची ही एकूलती एक कन्या भीमाई होय.
या भिमाईने ब्रिटीशांविरूद्ध दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही.
भिमाईचा पराक्रम झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ४० वर्ष आधीचा आहे. परंतु या शूरवीर रणरागिणीच्या देशभक्तीकडे, जाज्वल्य इतीहासाकडे आणि तिच्या शौर्यगाथेकडे इतिहासकारांनी कसेकाय दूर्लक्ष केले ?
होळकर राजवंशात होऊन गेलेल्या चौदा नर -नारी रत्नांनी २२० वर्ष अप्रतीम असा राज्यकारभार केला केवळ व्यापार समृद्धीच्या दृष्टीकोनातूनच नव्हे, तर इंग्रजांच्या घुसखोरी पासुन देखील होळकर राज्याच्या चतुर्सिमा सुरक्षीत राहिल्यात . मध्यप्रदेशातील इंदोर स्थित होळकरांचे राज्य सहजासहजी इंग्रजांना गिळंकृत करता आले नाही. हेच त्यांच्या देशभक्तीचे धोतक आहे.भीमाईने रणांगणावर बलाढ्य ब्रिटीश सेनेची उडविलेली दाणादाण , त्यांचा अनेकदा केलेला पराभव , वेळोवेळी भीमाने दाखविलेला मुत्सदीपणा , रणसंग्रामाचेवेळी दाखविलेली वीरता , इंग्रज सेनेचे पाडलेले मुडदे यांमुळे इंग्रज प्रचंड दुखावलेले होते. भीमाईला धडा शिकवण्यासाठी ब्रिटीश योग्य संधीची वाट बघत होते.
एकदा भीमाईला पकडण्यासाठी इंग्रजांनी प्रचंड मोठा सैन्यांचा घेरा घातला. ब्रिटीश कर्नल माल्कमच्या योजनाबद्ध घेरावास भीमाई न्याहळत होत्या. जेव्हा घेराव अतिशय जवळ आला तेव्हा भीमाईने घोड्याची लगाम जोरात ओढली. पायाची टाच मारली. घोड्याचे दोन्ही पाय भीमाच्या डोक्यावर उसळले . माल्कम स्वतःचा बचाव करण्यासाठी विचलीत होत नाही तोच भीमाईच्या घोड्याने मोठी उडी मारली आणि घेरावाच्या पलीकडे भीमाईने घोडा उडविला. क्षणभर माल्कमला काय करावे काहीच सुचले नाही. तोपर्यंत भीमाई प्रचंड वेगाने घोडा पळवत जंगलात अदृश्य झाली. भीमाईला जिवंत पकडण्याचे स्वप्न पाहणारा माल्कम हतबल होऊन केवळ बघतच राहिला.
" वीर शेरनी लडनेवाली ,
रण से हूई सगाई थी ।
खूब लडी मर्दानी रणमें ,
वह तो इंदोर की भीमाई थी ।। "

अनेकदा रणांगणावर माल्कमला मात देऊन चकमा देणारी भीमाई जंगलात द-याखो-यात आश्रय घेत असे. गुप्तपणे गनिमी काव्याचे युद्ध तंञ वापरून ब्रिटीशांच्या शस्ञगारावर, खजीन्यवर , पोलीसठाण्यावर , सैन्य छावणीवर , धान्याच्या गोदामावर अचानक हल्ला करून त्यास लुटत असे यामध्ये आडकाठी बनणा-या इंग्रज सैन्यांना कापून पसार होत असे.
ज्या पद्धतिने गनिमी काव्याचा युद्ध तंञाने लढून छ.शिवराय व राजर्षी मल्हारबा यांनी शञूंना नामोहरम केले. अगदी तसेच शिवमल्हार तंञ वापरून भीमाईने इंग्रजांना नामोहरम केले .

१८१७ चे महिदपूरचे युद्ध
-------------------------------
महाराज यशवंत (प्रथम) याच्या मृत्यूनंतर होळकर संस्थानाच्या राजपदाची सूञं केशरबाईच्या ( कृष्णाबाई) पोटी जन्मलेला मल्हारराव ( द्वितीय) यांना रितसर देण्यात आलीत. अल्पवयीन मल्हारराव राजे जरी असले तरी शासन - प्रशासनातील बहूतांशी निर्णय केशरबाई व भीमाईच घेत असे . अशातच २० डिसेंबर १८१७ चे ब्रिटीशांविरूद्ध होळकरांचे युद्ध हे भारतीय इतिहासातील एक अविस्मरणीय घटना आहे.
भीमाईकडे २५०० छापामारीत प्रवीण असणारे घोडेस्वार होते. याशिवाय ८० तोफा , ३००० घोडदळ, ३०, ००० पायदळ तलवार एवं बंदुकांनी सज्ज होते.
इंग्रज पूर्ण तयारीनीशी होळकर संस्थान गिळंकृत करण्याच्या उद्देशाने इंदोरवर आक्रमणा करणार असल्याची सुचना राजदरबारात येऊन धडकली . लगेच भीमाईने यद्धची तयारी सुरू केली.
कॅप्टन टॉड, रायन, विकर्स या ब्रिटीश योद्ध्यांकडून प्रशिक्षण प्राप्त इंग्रज सेना महिदपूर गावच्या सिमेजवळ येऊन पोहचली .ब्रिटीश सेनेचा प्रचंड जमावडा सुरू झाला.
देशभक्ती रोमारोमात संचारलेल्या होळकर सेनेने ब्रिटीश सेनेवर प्रचंड आक्रमण केले . भीषण युद्धाला प्रारंभ झाला. वीस वर्षीय भीमाई भुकेल्या शेरणी सारखी दाहडत इंग्रज सेनेवर तूटून पडली . भीमाई अभूतपूर्व सैन्य संचलन, शस्ञ संचलन व युद्ध संचलन करून सेनेत जोश भरत होती.

ब्रिटीश सेनेचे नेतृत्व प्रचंड अनुभवी व भारतात दरारा असलेल्या कर्नल माल्कम, कमांडर टॉम्स हिस्लाप आणि मेजर हंट यांच्याकडे होते. भिषण युद्धाला प्रारंभ झाला. २० वर्षीय भीमाई, १२ वर्षीय राजे मल्हारराव, २० वर्षीय हरिराव (विठोजींचा मुलगा) हे बालक होळकर सेनेचे नेतृत्व करत होते. या बालवीरांच्या नेतृत्वात होळकर सेना ब्रिटीश सेनेवर तुटून पडली.
राजे मल्हारराव हत्तीवर बसून लढाई करत सैनिकांचे मनोधैर्य व आत्मविश्वास वाढवत होते.
भीमाईने घोड्याची लगाम दातात धरली . दोन हातात दोन तलवार घेऊन अक्षरशः ब्रिटीश सैन्यांना कापून काढत होती. भीमाईच्या शौर्याचा संदेश एका ब्रिटीश सैनिकाने मेजर हंटला कळविला . तो एकून आश्चर्यचकीत झाला. आणि लगेच भीमाईच्या दिशेने यायला लागला. विजेसमान कडाडत आणि शेरणीसारखी दाहडत भीमाई ब्रिटीश सैन्याचे मुडदे पाडतांना पाहून युद्धाचा प्रचंड अनुभव असणा-या मेजर हंटची पाचावर धारणा बसली.
मेजर हंट सैन्य तुकडीसह आपल्याकडे येतांना पाहून सिंहगर्जना करत अश्वरूढ भीमाई प्रचंड वेगाने हंटच्या दिशेने निघाली. क्षणार्धात तलवारीने हंटवर वार केला. हंटने कसाबसा तो वार बचावण्याचा प्रयत्न केला. हातातली तलवार बाजूला पडली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी झालेला हंट स्तब्ध होऊन केविलवाण्या नजरेने भीमाईकडे पाहू लागला.
हे फिरंग्या मी निशस्ञावर वार करत नाही. बघतोस काय ? ऊठ आणि युद्धाला तयार हो ! नाही तर जा आपल्या जखमेवर उपचार करून घे !
शेवटी तहाने युद्धाचा शेवट जरी झाला असला तरी बलाढ्य ब्रिटीश सैन्याची एका धनगराच्या मुलीने अशी दाणादाण उडवणे ही गोष्ट खरोखरच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.


होमेश भुजाडे नागपूर 9422803273

No comments:

Post a Comment