Sunday, 21 July 2013

धनगरांच्या पशुचराई करिता.....

धनगरांच्या पशुचराई करिता ज्या कुरणाच्याजमिनी आहेत त्यावर राजकारणी ,गावगुंड, भांडवलदार, बिल्डर व उद्योजक हे स्वतःहाचे काँलेज, उद्योग, बंगले, तारांकित हाँटेल, व वसाहती उभारत आहेत, महाराष्ट्रातील शासन व प्रशासनात असणा-या मराठावादी व मनुवादी यांच्या संगनमताने चराऊ कुरणांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात हे लोक लाटत आहेत. त्यामुळे धनगरांपुढे पशुचराईच्या कुरणांच्या जमिनीचा प्रश्न बिकट झालेला आहे. हे सत्य ओळखून प्रस्थापितांना विस्थापीत करण्यासाठी धनगरांनी सिद्ध झाले पाहिजे.
----------------------------------------------------------
हडप्पा मोहेंजोदडो नावाने ओळखल्या जाणा-या जगातील भारतीय प्राचीन संस्कृतीचे जनक मूलतः धनगर आहेत. हा मूलनिवासी पशुपालक समूह त्या संस्कृतीचा वारस आहे. ही जमात या देशातील आदिवासी आहे.
या संस्कृतीच्या उत्खननात अनेक चिञ, शिल्प व मुद्रा सापडल्यात त्यांवर पशुंची व पशुपालकांची चिञ कोरलेली आहेत. यावरुन ही संस्कृती पशूपालकांची होती हे सिद्ध होते. नंतर ती उत्क्रात होत - होत नागरी संस्कृतीत परावर्तीत झाली. ही संस्कृती स्ञीप्रधान होती. मातृसत्ताक पद्धतीवर आधारलेली होती. ही संस्कृती अतिशय प्रगत, समृद्धशाली, व वैभवशाली होती. तेथील लोकांमध्ये परस्परात समता, ममता व बंधुता होती. स्वातंञ्य, न्याय या मूल्यांवर ती अधिष्ठीत होती. या संस्कृतीचा -हास वैदिक आर्यांनी घडवून आणला असे अनेक इतिहास तद्न्यांचे म्हणने आहे.

----------------------------------------------
प्राचीन काळी द्न्यान विद्न्यानाची आजच्या सारखी प्रगती झालेली नव्हती. त्यामुळे विश्वनिर्मीतीचा व सजीवांच्या उत्पत्तीचा संबंध देवाशी जोडला गेला होता. या विश्वाचा जन्म झाल्यापासुन ज्या रासायनिक आणि भौतिक प्रक्रीया निरंतर होत राहिल्यात त्यातूनच आजची सजीव सृष्टी उदयास आली. हे ठामपणे विद्न्याने सिद्ध केलेले आहे. तरी देखील ज्या ऐतखाऊ लोकांचा धंदा देव -धर्मावर चालतो ; ते सत्संग, प्रवचनात साक्षात देवांनीच हे सर्व निर्माण केल्याचा खोटा आणि निराधार प्रचार करत असतात. विश्वनिर्मीती कोणत्याही ' दिव्यरूपी ईश्वर शक्तीतून ' झालेली नसून ती एक नैसर्गिक प्रक्रीया आहे.
--------------------------------------------
अलिकडे महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंग करण्याच्या नावाखाली धनगर समाजातीलच तथाकथीत दलाल धनगर समाजाला इतर पक्ष व संघटनेच्या दावणीला बांधण्याचा कट आखत आहेत. कोणी बीजेपी -शिवसेना -मनसेला तर कोणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि तत्सम पक्षाला समाजास नेऊन भीडवू इच्छीतात ;तर काही समाज परिवर्तन करण्याच्या नावाखाली संघ, बिग्रेड, सेफ, मोर्चा व तत्सम संघटनांमध्ये समाजाला नेऊ इच्छितात.
पण आपण स्वत: समाजाचा बळकट पक्ष व व्यापक संघटना निर्माण करून इतरांना त्यात जोडण्यासाठी अशा दलालांकडे कोणतेच कृती कार्यक्रम नसतात. चिंताग्रस्त समाजाला चिंतनाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोणतेच नियोजन नसते. पद -प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी डोळे मिटून स्वार्थांधाने झपाटलेल्या आणि दुस-यांचे झेडे स्वखांद्यावर वाहून गुलाम व लाचार बनलेल्या अशा प्रवृत्तीशिल महाशयांना धनगर समाजाने यांचा दळभद्रीपणा ओळखून खडया सारखे बाजुला काढूण ठेवणे गरजेचे आहे .





होमेश भुजाडे
नागपूर 
9422803273

No comments:

Post a Comment